Monday, 2 November 2020

उपक्रम: कथा क्रमांक:५६

 

सोन्याची पिसे -  download%2B%252815%2529

एका गावाच्या जवळ एक तळे होते. त्या तळ्यामध्ये एक हंसीण रहात होती. त्या तळ्याजवळच एक गरीब बाई आपल्या दोन मुलीं सोबत राहत होती. त्या हंसीणला सोन्याची पिसे होती. एके दिवशी हंसीणला वाटते की, आपण या गरीब बाईला सोन्याची पिसे देऊन मदत करूयात. आपण जर या बाईला मदत केली तर ती आणि तिच्या मुली आनंदाने राहतील.

दुसऱ्या दिवशी हंसीण त्या गरीब बाईला भेटायला गेली आणि म्हणाली, माझे एक सोन्याचे पीस मी तुम्हाला रोज देत जाईन. त्यानंतर हंसीण रोज त्यांना एक सोन्याचे पीस देऊ लागली. त्यामुळे ते कुटुंब सुखी झाले. कुटुंबाची परिस्थिती बदलली. आता ते आनंदाने राहू लागतात.

पुढे ती बाई लोभी बनली. ती ठरवते की एकदाची हंसीणची सर्व पिसे काढून घेऊयात. दुसऱ्या दिवशी ती बाई हंसीणला पकडते आणि पिसे ओढू लागते. पण अचानक त्या हंसीणच्या पिसांचे रंगरूप पालटते. पिसे सामान्य होऊन जातात. ते पाहून बाईला आश्चर्य वाटते.

हंसीण तिला म्हणते ' मी तुला मदत करण्याचे ठरवले होते पण तू हावरट झालीस. आता मी कधीही पुन्हा परत येणार नाही.' या बाईला आपली चूक उमगते आणि ती त्या हंसीणची माफी मागते. हंसीण तिला म्हणते 'पुन्हा कधी असा हावरटपणा करू नकोस' असे म्हणून ती उडून जाते.

तात्पर्य - माणसाने जास्त लोभी नसावे जे मिळते ते ही गमवून बसतो.

No comments:

Post a Comment