Friday 18 December 2020

*मिस कॉल द्या📲... गोष्ट ऐका 👂उपक्रम...*

 आतापर्यंत आपण १०० गोष्टी वाचन केल्या आहेत. आता यापुढे 

*मिस कॉल द्या📲... गोष्ट ऐका 👂उपक्रमात सहभागी व्हावे. 


08068264443


या नंबरवर कोणत्याही मोबाईल वरुन मिस कॉल द्या. 


व 


नवनवीन गोष्टींचा आनंद घ्या. 


*😊केव्हाही... कोठेही🤷‍♂️*

(योगेश गांधेले)

Tuesday 15 December 2020

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢

 *स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢


प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक नाशिक विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  


*विभागाचे नाव - नाशिक* 

विभागातील जिल्हे : *अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार*   


स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇 

https://wa.me/918595524517?text=Namaskar 


कोणासाठी - *१ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी*

माध्यम - *मराठी / सेमी - इंग्रजी*

विषय - मराठी आणि गणित 

कधी - *दर शनिवारी.* विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.  


✍️ विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या. 🙏


*स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा.* 👇

https://youtu.be/y6JdEX6c4AU


*महत्वाची गोष्ट* - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.

उपक्रम: कथा क्रमांक:१००

 अनुभवाच्‍या जोरावर यश - 

अनुभवाच्‍या जोरावर यश - 

download
एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.

तात्‍पर्य : अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो.

Monday 14 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९९

 अन राजाचे डोळे उघडले-

images%2B%252823%2529


 रामगडचा राजा अतिशय सणकी होता. एके रात्री त्याच्या डोक्यात अशी सनक शिरली. त्याने आपल्या दरबारातील मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले कि,
" आम्ही हे जाणून घेवू इच्छितो कि राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे कि नाही?" राजा आणि मंत्री रात्रभर आणि पूर्ण दिवस नगरात फिरत होते. 
शहराबाहेर त्यांना एक झोपडी दिसली, राजाने त्याच्याजवळील १०० सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघेजण राजवाड्याच्या दिशेने निघाले.
 राजाने वाटेल त्याची कल्पना मंत्र्याला सांगितली,"या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो सुवर्णमुद्रा परत करण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेंव्हा आम्ही त्याला बक्षीस देवू आणि त्याने त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू.
" ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला झोपडीकडे येताना पहिले होते. राजा सणकी आहे हे त्याला माहित होते.
 त्याने राजाला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राजाला त्याने सांगितले.
 राजाने खुश होवून त्याला २०० सुवर्णमुद्रा भेट दिल्या. नंतर हाच क्रम चालू राहिला. दर पाचव्या दिवशी कुणीतरी सुवर्णमुद्रा घेवून दरबारात येत असे व राजा त्याला दुप्पट मुद्रा देत असे.
मंत्र्याने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत चालली होती. 
प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे मंत्र्याला समजत होते पण त्याचा नाईलाज होता.हे सगळे सहन न झाल्याने त्याने अखेर एक दिवस धाडस करून मंत्री राजाला घेवून श्यामच्या घरी गेला तर पाहतो काय?
 श्याम आणि भेटी मिळवणारा प्रत्येकजण तेथे हजर होता. झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता. सर्वजण ऐषारामात राहत होते. सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला. त्याचे डोळे उघडले, त्याने श्यामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोशात जमा करण्याचे आदेश दिले.

तात्पर्य-मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे कि नाही याचाही विचार व्हायला हवा. 

Sunday 13 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९८

 आई ती आई-

download%2B%252817%2529


मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्‍या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींनाही या दोघींतली खरी आई कोण ?' हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, 'ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.'
न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, 'महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं.
महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला ?' त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, 'हे बालक या बाईचंच आहे. 'त्याला कापण्यात यावं, 'असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.'

अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

Saturday 12 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९७

 बैल आणि चिलट-

download%2B%252811%2529



बैल आणि चिलट

 एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, 
मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला,
 मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!

तात्पर्य : काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।

Friday 11 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९६

 मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी ! -

download%2B%25281%2529


मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !

एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली.
देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला !
मित्रांनो, भिकारी कोठे चुकला, ते ओळखा. तुम्हालाही सदोदित आनंदीरहायचे असेल, तर ‘समाधानी वृत्ती’ ठेवा.

Thursday 10 December 2020

उपक्रम: कथा क्रमांक:९५

 कृष्णाचे सवंगडी - 



20200325_002815



कृष्णाचे सवंगडी - 

"कृष्ण व त्याचा भाऊ बलराम हे दोघं सहा-सात वर्षांचे झाले. तेव्हा त्यांना चांगले वस्त्रं नेसवून, त्यांच्या डोक्यावर मोरपिसांचा मुकुट घालून आणि हातात काठी व पावा देऊन गाई आणि वासरं चारावयास वनात पाठवलं जात.
ते दोघं भाऊ दररोज सकाळी न्याहारी करून रानात गुरं राखायला जाऊ लागले.
त्यांच्याबरोबर इतरही आणखी बरीच गवळयांची मुलं जात असत.
तेथे गेल्यावर रानामध्ये ही मुलं अनेक वेगवेगळया प्रकारचे खेळ खेळून सगळा दिवस मजेत घालवत असत.
कृष्ण हा त्यांचा सर्वांचाच खूप आवडता होता. त्यामुळे सगळया गोपाळांना आपण त्याच्याजवळ नेहमी असावं असे वाटत असे.
कधी सवंगडयांबरोबर खूप धावावं. तर कधी पक्षांचे आवाज काढावे. कधी झाडांवरची फळं काढावी, एकमेकांना वाकुल्या दाखवाव्या असं रोज चालायचं.
कृष्ण दुपारच्या वेळेस यमुनेच्या काठी असलेल्या एखाद्या वृक्षाखाली उभा राहून त्याचा पावा वाजवत असे.
तो आवाज ऐकून त्याचे सर्व सवंगडी व गाईवासरं त्याच्याभोवती जमत असे.
गाईवासरं पाणी पिऊन रवंथ करू लागली की, कृष्ण व त्याचे सवंगडी एकत्र बसून मजेत जेवण करत. कृष्णाच्या हातून खाल्लेला घास सगळयांनाच आवडत असे.
कृष्णांच्या या सवंगडयांध्ये त्याचा सर्वात आवडता सवंगडी होता पेंद्या.
तसेच पेंद्याचे देखील कृष्णावर फार प्रेम होते. जर त्याला कृष्ण कुठे दिसला नाही तर तो कावराबावरा होत असे.
संध्याकाळ झाली की सर्वजण परत आपल्या घरी जात असे. आणि पुन्हा केव्हा एकदा सकाळ होते व आपण कृष्णाबरोबर वनात जातो अस त्यांना होत असे.